आता पोलिसच तुला खाली उतरवतील...

चौफुला - बारामती या बसने मोठ्या  संख्येने विद्यार्थी प्रवास करीत असतत .शाळा सुटण्याच्या वेळेत बसला  नेहमीच खुप गर्दी असते . अनेकदा बसमधे उभा रहायला ही जागा मिळत नाही . यामुळे बस बारामती आगारात आली की शाळकरी मुल बसमधे जागा मिळवण्यासाठी खिडकीतून बसमधे चढणे ,शाळेच्या सॅक खिडकीतून सिटवर ठेवुन जागा पकडणे असे प्रकार करीत असतात .
चौफुला - बारामती मार्गावरील बसचे काही कंडक्टर आपण खुपच शिस्तप्रिय असल्याचा आव आणत असतात . असाच एक कंडक्टर चौफुला बस जवळील गर्दीत उभा होता .
बसमधे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू होती ..एकमेकांना धक्का देत ,दुसर्यांना बाजुला सारुन जो तो प्रवासी बसमधे जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता . हे दृश्य पाहुन आपल्याला बसमधे जागा मिळणार नाही .हे ओळखुन एक शाळकरी विद्यार्थी थेट बसच्या खिडकीतून बसमधे जाऊ लागला . हे पाहताच कंडक्टर महाशयांनी त्या खिडकीकडे ओरडत धाव घेतली परंतु तोपर्यंत तो विद्यार्थी बसमधे जाऊन बसला .
तोपर्यंत अनेकजण कंडक्टर महाशय विद्यार्थ्याला कसे खाली उतरवतात हे पाहण्यासाठी त्या खिडकीकडे डोळे लावुन होते .
आपण बसजवळ असतानाही विद्यार्थी खिडकीतून कसा काय आत जाऊ शकतो ? या विचाराने चिडलेल्या कंडक्टर महाशयांनी त्या विद्यार्थ्याला खिडकीतून आवाज देऊन बाहेर यायला सांगितले . मात्र तोवर तो  शाळकरी विद्यार्थी बसमधे जागा मिळवुन युद्ध जिंकल्याच्या आवेशात बसमधे बसला होता . त्याने   बसमधुन खाली येण्यास साफ नकार दिला . मग कंडक्टर महाशय आणखीच चिडले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला ''तु खाली ये '' नाहीतर पोलीस बोलावतो , आता पोलीसच तुला खाली उतरवतील असा सज्जड दम भरला . मात्र त्या विद्यार्थ्याने बसमधुन खाली उतरण्यास साफ नकार दिला .
पोलिस बोलवण्याची धमकी देऊनही विद्यार्थी बसमधुन खाली न आल्याने कंडक्टर महाशयांपुढे माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही . . वेळ मारुन नेण्यासाठी त्यांनी हासुन विद्यार्थी कसे डांबरट आहेत हे दाखुन देण्याचा प्रयत्न केला . यामुळे प्रवाशांत एकच हशा पिकला .


फोटो स्त्रोत : गुगल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?