पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .

 ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .   सचिन जगन्नाथ आव्हाड , T.Y.B.VOC (JMC) , ROLL NO: 11507 ग्लोबल वॉर्मिंग फक्त भारत देशासमोरील प्रश्न नाही , तर ही संपुर्ण जगासमोरील समस्या आहे . आजकाल सगळीकडे जागतिक तापमान वाढीबाबत लोक चर्चा करताना  दिसत आहेत . कारण आता सगळ्यांना तापमान वाढीचे परिणाम दिसु लागले आहेत . या शतकातील १७ वर्षे पृथ्वीवरील सर्वांत उष्ण वर्षे होती. या  वर्षांत ०.२०°से ची वाढ सरासरी तापमानात झाली आहे . गेली ६-७ वर्षे पृथ्वीच्या एकंदरीत व स्थानिक सरासरी तापमानात सतत वाढ होत आहे. तापमान वाढीबाबतचे अहवाल स्पष्टपणे म्हणतात की . उत्तर ध्रुवप्रदेशांत दुप्पट वेगाने तापमान वाढ होत आहे. अंटार्क्टिका हा दक्षिण धृवीय क्षेत्रात सरासरी तापमानात वेगाने  वाढ होत आहे. मागील ५० वर्षांत तेथे सरासरी तापमानात जवळपास ३° से ची वाढ झाली. पश्चिम अंटार्क्टिकातील भागातील हिमनद्या सातत्याने मागे हटत आहेत. याचा एकत्रित अर्थ असा आहे की, तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. तातडीने युनोकडून पृथ्वीवर 'पर्यावरणीय आणिबाणी' घोषित व्हायला हवी. तरच जनतेला याचे गांभीर्य समजेल.  असाहि सूर का