ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .

 ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .
  सचिन जगन्नाथ आव्हाड ,

T.Y.B.VOC (JMC) , ROLL NO: 11507


ग्लोबल वॉर्मिंग फक्त भारत देशासमोरील प्रश्न नाही , तर ही संपुर्ण जगासमोरील समस्या आहे . आजकाल सगळीकडे जागतिक तापमान वाढीबाबत लोक चर्चा करताना  दिसत आहेत . कारण आता सगळ्यांना तापमान वाढीचे परिणाम दिसु लागले आहेत . या शतकातील १७ वर्षे पृथ्वीवरील सर्वांत उष्ण वर्षे होती. या  वर्षांत ०.२०°से ची वाढ सरासरी तापमानात झाली आहे . गेली ६-७ वर्षे पृथ्वीच्या एकंदरीत व स्थानिक सरासरी तापमानात सतत वाढ होत आहे.

तापमान वाढीबाबतचे अहवाल स्पष्टपणे म्हणतात की . उत्तर ध्रुवप्रदेशांत दुप्पट वेगाने तापमान वाढ होत आहे. अंटार्क्टिका हा दक्षिण धृवीय क्षेत्रात सरासरी तापमानात वेगाने  वाढ होत आहे. मागील ५० वर्षांत तेथे सरासरी तापमानात जवळपास ३° से ची वाढ झाली. पश्चिम अंटार्क्टिकातील भागातील हिमनद्या सातत्याने मागे हटत आहेत. याचा एकत्रित अर्थ असा आहे की, तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. तातडीने युनोकडून पृथ्वीवर 'पर्यावरणीय आणिबाणी' घोषित व्हायला हवी. तरच जनतेला याचे गांभीर्य समजेल.  असाहि सूर काही देशांतुन उमटत आहे .

जागतिक तापमान वाढीमुळे आता निसर्गात मोठे बदल होत आहेत . धृवीय क्षेत्रात याचे  वेगाने परिणाम दिसत आहेत . हिमनद्या वेगाने वितळत आहेत .  लाखो वर्ष साचून राहिलेले बर्फाचे ग्लेशियर आता वेगाने वितळत आहेत .  निसर्गाचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे . याबाबत फक्त चर्चा होताना दिसत आहे.  मात्र उपाययोजना करण्याबाबत सर्वत्र उदासीनता दिसून येत आहे . या तापमान वाढीचे परिणाम गंभीर आहेत . जर अशीच तापमान वाढ होत राहिली तर लवकरच धृवीय क्षेत्रातील बर्फ वितळून समुद्राच्या  पाणी पातळीत  वाढ  होऊन जगभरातील समुद्र किनाऱ्या लगतची महत्वाची  शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे . यात भारत देशातील मुंबई सारखे शहर देखील पाण्यात जाण्याचा धोका आहे .

तापमान वाढीमुळे आता काही देशाच्या नैसर्गिक पर्यावरणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे .  मान्सून  देखील  या तापमान वाढीचा परिणाम होताना दिसत आहे .  तसेच जगभरातील काही देशांच्या वाळवंटी भागात वाढ होताना दिसत आहे . तसेच जागतिक तापमान वाढीचा वाईट परिणाम हा मानवा सोबतच प्राणिमात्रांना भोगावा  आहे . प्राण्यांना तापमान वाढीचा सामना करणे अवघड जात आहे . काही प्राण्यांच्या प्रजाती या तापमान वाढीशी जुळवून घेऊ शकत नसल्याने त्यांच्या प्रजनन शक्तीवर मोठा परिणाम होत आहे . यामुळे काही प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.
 ओझोन वायूचा थरसूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करीत असतो . जागतिक तापमान वाढीमुळे सजीवांच्या रक्षणासाठी आवश्यक असणार ओझोन वायूचा थर हळू हळू नष्ट होताना दिसत आहे .
जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे .  नाहीतर याचे गंभीर परिणाम होऊन पृथ्वी वरील सजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा धोका आहे .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?