पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विठु नामाचा जप करत अवघड रोटि घाट होतो सहज पार..

इमेज
आज सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच उठलो  कारण ही तसेच होते . आज माझ्या पाटस गावात जगदगुरु संत तुकोबारायांच्या पालखीचे आगमन होणार होते . पालखी सोहळा  गावात येणार यामुळे उत्साह वाटत होता . गावात पालखी फक्त दोनच तास ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरात विसावा घेते आणि नंतर रोटी घाटाकडे पालखीचे प्रस्थान होते . जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो . सध्याच्या काळातील वाहनांसाठी हा घाट पार करणे अवघड नाही . परंतु पालखी रथ हा आज ही बैलांच्या साह्याने ओढला जातो . घाटातील चढण , तीव्र वळणे यांमुळे रोटी  घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अवघड टप्पा आहे . हा टप्पा पार करताना मोठी कसरत करावी लागते . रथाला अनेक बैलजोड्या जोडल्या जातात . हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात . पाटस गावातील खुप लोक पालखी सोहळा रोटी घाटाच्या वर पोहचवण्यास येत असतात . तसाच मी ही आलो होतो . दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पालखी घाटाच्या पायथ्याला आली . तेथे पालखी रथास आणखी पाच बैलजोड्या