पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता पोलिसच तुला खाली उतरवतील...

इमेज
चौफुला - बारामती या बसने मोठ्या  संख्येने विद्यार्थी प्रवास करीत असतत .शाळा सुटण्याच्या वेळेत बसला  नेहमीच खुप गर्दी असते . अनेकदा बसमधे उभा रहायला ही जागा मिळत नाही . यामुळे बस बारामती आगारात आली की शाळकरी मुल बसमधे जागा मिळवण्यासाठी खिडकीतून बसमधे चढणे ,शाळेच्या सॅक खिडकीतून सिटवर ठेवुन जागा पकडणे असे प्रकार करीत असतात . चौफुला - बारामती मार्गावरील बसचे काही कंडक्टर आपण खुपच शिस्तप्रिय असल्याचा आव आणत असतात . असाच एक कंडक्टर चौफुला बस जवळील गर्दीत उभा होता . बसमधे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू होती ..एकमेकांना धक्का देत ,दुसर्यांना बाजुला सारुन जो तो प्रवासी बसमधे जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता . हे दृश्य पाहुन आपल्याला बसमधे जागा मिळणार नाही .हे ओळखुन एक शाळकरी विद्यार्थी थेट बसच्या खिडकीतून बसमधे जाऊ लागला . हे पाहताच कंडक्टर महाशयांनी त्या खिडकीकडे ओरडत धाव घेतली परंतु तोपर्यंत तो विद्यार्थी बसमधे जाऊन बसला . तोपर्यंत अनेकजण कंडक्टर महाशय विद्यार्थ्याला कसे खाली उतरवतात हे पाहण्यासाठी त्या खिडकीकडे डोळे लावुन होते . आपण बसजवळ असतानाही विद्यार्थी खिडकीतून कसा काय आत

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला असा प्रश्न मला नेहमीच पडत असतो .कारण हजारो शेतकरी बांधव दरवर्षी या ना त्या कारणाने आत्महत्या करत आहेत .हे आत्महत्या करण्याचे सत्र  थांबण्याचे नाव घेत नाही .... धर्मा पाटील यांचा संघर्ष 2009 ते 2014 दरम्यानचा. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता त्या काळात होती. आणि तेव्हा त्यांना न्याय मिळाला नाही. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या विखरण गावातले शेतकरी. 2015 साली औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची 5 एकर जमिन संपादित करण्यात आली. 5 एकर बागायती शेतीचा मोबदला मिळाला केवळ 4 लाख रुपये.  ही भरपाई इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत फार कमी होती. त्यामुळे वयोवृद्ध धर्मा पाटील यांनी योग्य भारपाईसाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र गेंड्याची कातडी असलेली यंत्रणा जागी होईल तर शपथ. आणि आता भाजपा सरकारच्या काळातही त्यांना न्याय मिळाला नाही .यंत्रणांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं धर्मा पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं. 22 जानेवारीला त्यांनी मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्यांचा मृत्यु झाला . एकंदरीतच काय तर इथल्या  शेतकर्यांस